बारामती : बारामती म्हंटले की विकसित शहर असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.त्याच बारामतीत अनेक वर्ष जनता दरबार जनतेसाठी घेतला जातो.याठिकाणी अधिकारी,कर्मचारी नेत्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात.आता तर दोन जनता दरबार म्हणजे नागरिकांच्या अडचणी सुटतील अशी परिस्थिती दिसत आहे.
एवढ्या वर्ष आमदार,खासदार एकाच पक्षाचे असताना देखील आजसुध्दा नागरिकांना रांगेत उभे राहून आपले प्रश्न जनता दरबारात मांडावे लागतात.
निवडणुकीवेळी जसे नागरिकांचे घरापर्यंत प्रचार करण्यासाठी नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जाऊन प्रचार करत असतात.त्यावेळी लोकांनी प्रश्न जाब विचारला पाहिजे की आमच्या अडचणी नेत्या पर्यंत पोचवून न्याय मिळवून देण्यासाठी हेच कार्यकर्ते कधी दिसणार नाहीत. कार्यकर्ते आता नेत्याला दाखवतात की मी किती जोरात प्रचार करीत आहे.कधीच लोकांचे काम न करणारे प्रचार करीत असतील तर याच कार्यकर्त्यांमुळे लोकांचे मत परिवर्तन होत आहे.लोकांची कामे न करणाऱ्या व्यक्ती वर जनता विश्वास ठेवणार का?कधी इतर वेळेस न दिसणारे कार्यकर्ते पदाधिकारी आता दिसू लागले आहेत.
नेता किंवा त्याचा कार्यकर्ता फक्त निवडणुकीपुरता जनतेच्या दारात येत असेल तर नक्कीच त्याला जनता जाब विचारणार अशी परिस्थिती आहे. असे अस्लम शेख पुणे जिल्हाध्यक्ष भारतीय युवा पँथर संघटना यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
ज्यांच्या हाती सत्ता त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याची का गरज का पडते? अद्याप पर्यंत या दरबारांमध्ये किती लोकांना न्याय मिळाला हे कधी जाहीर झाले नाही. नागरिकांनी देखील पुढे येऊन कधी याबद्दल मत व्यक्त केलेले दिसले नाही.
बारामती शहरातील जळोची येथील चव्हाण इको पार्क कडे जाणारा रस्ता कित्येक दिवस प्रलंबित होता सदर रस्त्यासाठी निवेदन,पाठपुरावा ,आंदोलनाचा इशारा भारतीय युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला त्यानंतर रस्ता सुरू करण्यात आला. चव्हाण इको पार्क येथे २०० फ्लॅट मध्ये नागरिक राहतात.सदर नागरिकांकडून घरपट्टी वेळेवर घेतली गेली परंतु रस्ता दिला नाही. विकसित बारामती नागरिकांना रस्त्यासाठी आंदोलन करावे लागते यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? त्यामुळे मतदान करताना नागरिक यावर विचार करतील.






