प्रतिनधी : गणेश थोरात
बारामती : रविंद्र भाऊ धंगेकर यांनी *अमोल कुलट* यांच्या सारख्या कार्यतत्पर व उमद्या तरुणाला बारामती लोणारी समाज संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी देऊन, त्यांच्यावर मोठाविश्वास दाखवला आहे. त्यांची निवड बारामती लोणारी समाज बांधवांसाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लोणारी समाजातील विविध विषयांवरील गतिमान विकासाला नक्कीच चालना मिळेल,’ असे मत या वेळी श्री. रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केले..

सत्काराला उत्तर देताना *श्री. अमोल कुलट* म्हणाले, ‘माझ्यासारख्या नवख्या तरूण कार्यकर्त्यावर समाजातील सर्व सन्माननीय मार्गदर्शकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी बारामती लोणारी समाज बांधवांचे , जेष्ठ नागरिक आणि लोणारी समाज संघटनेतर्फे आभार मानतो. पुढील काळात येणाऱ्या शहरातील सर्व समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करणार आहे. येत्या काळात आम्ही लोणारी समाज संघटनेच्या वतीने बारामतीतील सर्व समाजबांधव- महिला भगिनींशी संपर्क साधणार असून, येणार्या अडथळ्यांवर मातकरण्यासाठी निश्चित धोरण ठरवणार आहोत..






