बारामती : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर बारामती शहर ठेवणे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2026 अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याकरता मा. नगराध्यक्ष श्री सचिन सातव यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बारामती नगर परिषदेच्या कचरा डेपो या ठिकाणी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 23/02/2026 रोजी बारामती नगर परिषद स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती व समिती सदस्य यांची आणि आरोग्य विभागातील विभाग प्रमुख स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मा. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती श्री. नवनाथ बल्लाळ यांनी दर शुक्रवारी सकाळी 8.00 वा. महास्वच्छता अभियान घेण्याचा संकल्प केला. या महास्वच्छता अभियानाची सुरुवात शुक्रवार दिनांक 27/02/2026 रोजी सकाळी 7.45 वा. आदरणीय अजितदादा यांच्या समाधी स्थळी विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अभिवादन करून रुई गावठाण येथून करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, गणेश मंडळे, महिला बचत गट, इत्यादींनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
बारामती नगर परिषदेस माझी वसुंधरा 4.0 व 5.0 अभियानामध्ये सलग दोन वेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्यांकडून नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचारी मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांचे कौतुक करण्यात आले. व माझी वसुंधरा 6.0 अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच विविध विषयांवरती चर्चा करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक शौचालय व मुतारी, घंटागाडी, कचरा विलगीकरण, व्यावसायिक गाळेधारक, चिकन मटण विक्रेते यांच्याकडून निर्माण होणारा कचरा इत्यादी बाबत येणाऱ्या अडीअडचणी व समस्या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. व त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष सचिन सातव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि आरोग्य समिती सभापती नवनाथ बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याच्या सूचना स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती कडून करण्यात आल्या.
सदर बैठकीसाठी स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ, समिती सदस्य आरती शेंडगे (गव्हाळे), अनुप्रिता ताबे, सोमनाथ गजाकस आणि ॲड. अमोल सातकर, ज्योतिबा चव्हाण आणि आरोग्य विभाग प्रमुख यशराज बनसोडे, महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक स्वरूप अहिवळे, बारामती नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, शहर समन्वयक आकाश शिरसाठ व कार्यरत मुकादम हजर होते.
-
बारामतीच्या सूर्यनगरीत ‘घरफोडी’ करणारा अटक.. -
स्वच्छ, सुंदर, हरित बारामतीसाठी महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ




