इंदापूर -पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी सौ.रेश्मा सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
आपल्या पक्षाची विचारधारा व तत्त्व केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटना वाढवण्यासाठी रेश्मा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी नमूद केले.रेश्मा सूर्यवंशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांना राष्ट्रवादी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
“पक्षाने दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास पात्र ठेवण्याचा प्रयत्न करू. पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमधे पक्षाची विचारधारा, ध्येय धोरण समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचविन्याचे काम करणार असल्याचे रेश्मा सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा ,व तालुक्यातील राष्ट्रवादीचे अधिक अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
-
राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल मंत्री आदितीताई तटकरे यांचे विशेष अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार -
चिकन विक्रेते व मालक या सर्वाना एकत्र आणण्याचे काम करणार – . मोहिन (भाई) शेख संस्थापक चिकन विक्री मालक संघ बारामती




