चिकन विक्रेते व मालक या सर्वाना एकत्र आणण्याचे काम करणार – . मोहिन (भाई) शेख संस्थापक चिकन विक्री मालक संघ बारामती


बारामती : बारामती येथील चिकन विक्री करणारे यांच्या अडचणी सोडविण्याचे काम नेहमीच मोहिन शेख करीत असतात.सर्व चिकन विक्रेते यांना एकत्रित करण्यासाठी चिकन विक्री मालक संघ बारामती शहर रजिस्टर नं:-0000130/2024 या संघाची स्थापना केली आहे.

सर्व चिकन विक्रेते व मालक या सर्वांना एकत्र आणण्याचे काम व नवनवीन तरुणांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन व व्यवसायाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मा. मोहिन (भाई) शेख (संस्थापक अध्यक्ष, चिकन विक्री मालक संघ बारामती शहर यांनी सांगितले. त्याच्या पुढील वाटचालीस युवा वर्गाने शुभेच्छा दिल्या.तसेच चिकन विक्री करणारे दुकानदार यांनी देखील शुभेच्छा देऊन आमच्या अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page