बारामती : सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 18 जून रोजी बारामती नगरीमध्ये जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेच्या वतीने शारदा प्रांगण येथे पालखी विसाव्याची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी जवळपास 80 बाय 150 फुटांचा भव्य शाही मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे,
भाविकांच्या दर्शनासाठी महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग अशी व्यवस्था निर्माण करण्यात करण्यात आली आहे तसेच पालखी तळावर भाविकांच्या व नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, नागवडे वस्ती ते पालखी मुक्कामापर्यंत संपूर्ण बारामती शहर स्वच्छ करून घेण्यात आले आहे.
शहरातील विविध ठिकाणची समाज मंदिरे, शाळा, मंगल कार्यालय, हॉटेल, या ठिकाणी वारकरी मुक्काम करीत असतात त्याकरिता त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे
पालखी आगमनानंतर पालखीच्या पाठीमागे बारामती नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित राहून पालखी पुढे गेल्यानंतर लगेचच बारामती शहर स्वच्छता मोहीम हातात घेण्यात येणार आहे,
शहरातील सार्वजनिक ठीकणी असणाऱ्या सर्व शौचालयामध्ये जंतुनाशक औषध आणि फवारणी करून घेण्यात आली आहे,
पालखी तळावर व जिथे दिंड्या मुक्कामासाठी आहेत त्या भागात मच्छर डेंगू यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून धूर फवारणी वारंवार करण्यात येत आहे
वारकऱ्यांसाठी शहरातील सोळा ठिकाणी मोबाईल टॉयलेटचे व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये जवळपास एकूण 1000 शीट इतकी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे..
तसेच सर्व उभारणी करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेट शेजारी पूर्णवेळ पाण्याची व्यवस्था केली आहे..
वारकरी महिला व पुरुष यांच्या आंघोळीसाठी स्नानगृहे उभारणी करण्यात आली आहेत.
पालखी मुक्कामाच्या दिवशी नियमित पाणीपुरवठा तसेच सायंकाळी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे
सर्व वारकरी भक्तांना जलशुद्धी केंद्रावरून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये वारकऱ्यांसाठी दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत.निर्मल वारी हरित वारी योजनेअंतर्गत जवळपास 5000 हून अधिक वृक्षांची लागवड या निमित्ताने केली जाणार आहे व पंढरीच्या वारीच्या माध्यमातून पर्यावरणाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,शहरातील विविध मंडळे, सामाजिक संस्था, विविध महाविद्यालय यांच्या सहकार्याने तसेच सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या माध्यमातून निर्मल वारी अभियान तसेच मोबाईल टॉयलेटची संपूर्ण देखरेख व वारकऱ्यांमध्ये टॉयलेटचा वापर व्हावा म्हणून जनजागृती दिग्विजय तुपे, विवेक पांडकर, यांच्या टीमच्या सहकार्याने, वारकऱ्यांनी उघड्यावर शौचालयास न जाता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल टॉयलेट चा वापर व्हावा या हेतूने पूर्णवेळ प्रबोधन करण्यात येणार आहे तसेच अग्निशामक विभागाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरा डावा कालवा येथे 24 तास अग्निशामक दलाची टीम तैनात करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने पालखी मुक्कामा दिवशी शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाहने येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेतली आहे तसेच योग्य ती पार्किंग व्यवस्था निर्माण करून दिली आहे.. अशा पद्धतीने बारामती शहरात नगरपरिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी भक्तीमय वातावरण निर्मिती तयार करण्यात आली आहे…
-
भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात -
नांदेड अक्षय भालेराव खून प्रकरणात आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना विशेष बैठक बोलवण्याचे आदेश….




