बारामतीत पोलिस आणि अग्निशमन आधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्य तत्परतेमुळे युवकाचे वाचले प्राण


बारामती: बारामतीत तांबे नगर येथील पाण्याच्या टाकीवर एक इसम चढला आहे. अशी माहिती बारामती तालुका पोलिस यांना मिळाली. त्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक श्री.युवराज पाटील यांनी अग्निशमन विभागाला संपर्क करून सांगितले की एक इसम तांबेनगर महिला सोसायटी समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला आहे.यावेळी घटनास्थळी श्री.युवराज पाटील यांनी सदरील इसमाला बोलण्यात गुंतवून पाठीमागून अग्निशमन विभागातील धाडसी व प्रशिक्षित फायर सुपरवायझर श्री.निखिल कागडा आणि मदतनीस श्री.प्रज्वलित अहिवळे यांनी त्यांच्या जीवाची परवा न करता त्या इसमाला सुखरूप जिवंत खाली आणून त्याचे प्राण वाचविले,वाहनचालक श्री.निवृत्ती जाधव यांनी वेळेत अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचविले असून अग्निशमन अधिकारी श्री.कुल्लरवार यांनी बचाव यंत्रणा सज्ज केली होती. अग्निशमन विभाग अधिकारी कर्मचारी व बारामती तालुका पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांच्या कार्य तत्पर्तने एका इसमाचे प्राण वाचले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page