बारामती : रोहित बनकर यांनी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पदाचा राजीनामा दिला होता.परंतु त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी राजीनामा नामंजूर करून राजीनामा नामंजूर करण्याचे कारण कळविले आहे.रोहित बनकर प्रदेश उपाध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजीनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले यांनी राजीनामा नामंजूर करण्यात यावा असे आदेश भानुदास माळी यांना दिले.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाची भानुदास माळी यांनी अंमलबजावणी केली असून रोहित बनकर यांचा राजीनामा नामंजूर केला आहे.
पुन्हा एकदा ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले व पक्षाच्या आदेशाचे पालन करून ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम करणार असल्याची माहिती रोहित बनकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.