
बारामती : भारतीय युवा पँथर संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताद अस्लम शेख येणाऱ्या बारामती नगर परिषद ची निवडणूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत.
बारामती नगर परिषद वाढीव हद्दीतील जळोची मध्ये वस्ताद अस्लम शेख कायमचे रहिवासी आहेत.वाढीव हद्दीतील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन कामे लवकरात लवकर करण्यासाठी पाठ पुरावा करणार आणि गरीब लोकांना घरकुल मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे देखील अस्लम वस्ताद शेख यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
सामजिक कार्यात नेहमीच हिरारीने भाग घेत असतात.सामजिक कार्य करणारे कार्यकर्ते नगर परिषद मध्ये निवडून गेल्यावर नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.





