बारामती : मा. ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित होम मिनिस्टर हा कार्यक्रम अनंत अशा नगर बारामती येथे 12/12/2022 ला संपन्न झाला.

होलार समाज संघटना बारामती अध्यक्ष बळवंत माने व होलार समाजाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला. बारामती शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ. रेश्माताई संजय ढोबळे व हिरामण बळवंत माने युवा मंच यांनी हा कार्यक्रम पार पडला व त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय दादा पाटील तसेच बारामती शहराचे माझी उपनगराध्यक्ष राजेंद्र आबा बनकर तसेच बारामतीचे नगरसेवक कुंदन जी लालबिगे अॅड. धीरज जी लालबिगे तसेच बारामती शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अनिताताई गायकवाड व साधु बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अविनाश बांदल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख तुषार लोखंडे, परवेज भाई सय्यद (अध्यक्ष सहारा फाउंडेशन) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. अनंत अशा नगर बारामती येथे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात प्रथम बक्षीस पैठणी आणि सोन्याची नथ सौ. साक्षी अक्षय माने यांनी जिंकले तर दुसरे बक्षीस सौ. रेश्मा चौगुले तर तिसरे बक्षीस सौ. भारती भिसे यांनी जिंकले. तसेच या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आला व मध्ये सोन्याचे नाणे सौ. राणी पारशे यांनी जिंकले, दुसरा लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये सौ. रेश्मा चौगुले तर तिसरा लकी ड्रॉमध्ये सोन्याची नथ सौ. अनिता चौगुले यांनी जिंकली. महिलांनी या खेळाचा खूप आनंद घेतला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कांबळे आजी यांना सायकल देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होलार समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गोरे, संजय ढोबळे, विजू भाऊ अहिवळे, राहुल शिंदे, अक्षय माने, शेखर अहिवळे, सेवक अहिवळे, मंगेश खांडेकर, महादेव खांडेकर, विकास जाधव, योगेश तोरणे, रोहन करे, ऋषी तोरणे , उमेश कांबळे, निखिल ढोबळे , राहुल काळे व इतर मित्र परिवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. हिरामण बळवंत माने यांनी केले.






