परतिच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी- रासप


बारामती : बारामती शहर आणि तालुका परिसरात परतीचा पाऊस खुप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्या मुळे तालुका आणी परिसरातील शेतकऱ्याची शेतातील उभी पिके भुईसपाट झालेली आहेत, नदी ओढे नाले तुडुंब भरून वाहिल्या मुळे काही शेतकऱ्यांची उभी पिके देखील त्या पाण्यात वाहुन गेलेली आहेत, शेतकर्‍याच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसा मुळे माती मोल झालेला आहे,ऐन दिवाळीत शेतकर्‍यावर या परतीच्या पावसा मुळे संकट कोसळले आहे.

तरी लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍याला दिवाळीच्या तोंडावर तातडीची नुकसानभरपाई शासनाने द्यावी. या मागणी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने मा.तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले, या वेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.संदिप चोपडे, तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते,महादेव कोकरे,श्याम घाडगे, रेवन कोकरे,निखील दांगडे किशोर सातकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page