बारामती : दिनांक २०/१०/२०२२बारामती येथील मे.जिल्हा सत्र न्यायालयातील सेशन केस नंबर १२६/२०१८ मधील तीन आरोपींची भादवि कलम ३०६,४९८ अ,३२३,५०४,५०६,३४ मध्ये आरोपी असलेले पती,सासू व सासरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपिंत्तर्फे ॲड सचिन शिवाजी कोकणे यांनी काम पाहिले.आरोपीच्या वकिलांनी केलेला उलट तपास व युक्तिवाद ग्राह्य धरून मे.कोर्टाने सदर आरोपींची सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.याकामी आरोपीच्या वकिलांना ॲड.स्वरूप अजित सोनवणे यांनी सहाय्य केले.





