बारामती : मा.अजितदादा पवार यांचे ६३ व्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक फौडेशन , बारामती यांचे वतीने पाटस रोड दत्तनगर येथे ६३ कल्पवृक्ष( नारळ) व १०० आंबा, वड , पिंपळ, लिंब, जांभळ, चिंच असे १६३ वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे चेअरमन मा. सचिन सातव ,मा. ईम्तियाजभाई शिकीलकर,मा. बाळासाहेब चव्हाण पाटील,बा.न.प. मुख्याधिकारी मा.महेश रोकडे सोा. मा. दिलीपनाना ढवाण पाटील,मा. जमिरभाई ईनामदार,मा.लक्ष्मणराव मोरे,मा. ओंकार देशमुख मा. गणेश सोनवणे,मा. गणेश शिंदे ,मा. विशाल जाधव व मा. अनिताताई गायकवाड ऊपस्थीत होते.मा. सचिन सातव यांनी दादांना या उपक्रमातून शुभेच्छा देत वृक्षलावनेसाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.मा. संभाजीनाना होळकर, मा.शंकेश्वरकर सोा, मा.सुनिल महाडीक सोा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.या उपक्रमांत सिद्धिविनायक फौडेशनचे अध्यक्ष श्री. गणेश जोजारे, मा. संजय निंबाळकर,मा.श्रीकांत झोरे,मा. वाकळे आप्पा, मा.शंकरराव धायगुडे,मा. संजय धुमाळ,मा. अमोल जगदाळे,मा. हरिभाऊ जगदाळे,मा.मोईन शेख,मा. सागर दडस ,मा. विकास साळुंके,दिपालीताई सावंत,माधुरीताई निंबाळकर,सौरव अडाणे, रवि निंबाळकर,प्रतिक जोजारे, सुरज ओवाळ , केदार पाटोळे ,रोहीत साळुंखे,विकास सोनवने,करीम तंबोळी, आदिल तांबोळी,जमिर महत,शहीद डांगे,व फौडेशनचे सभासद बहुसंख्येने ऊपस्थीत होते. या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत बारामतीच्या विविध भागांत सिद्धिविनायक फौडेशनच्या वतीने नगरपालिकेच्या सहकार्याने ५०० झाडांची वृक्षलागवड करण्यात येणार आहे.






