राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न


बारामती : नगरसेविका सौ.अनिता जगताप व एस.एस.एस.ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश जगताप यांच्या वतीने राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगांव कारखान्याचे संचालक व माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक मयुर लालबिगे, आप्पा अहिवळे, युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, गणेश शिंदे, सिद्धनाथ भोकरे, शुभम अहिवळे, सुरजित पवार, सचिन एम.सातव, राकेश वाल्मिकी, संतोष सातव, प्रा.रमेश मोरे, ढेकळवाडीचे उपसरपंच शुभम ठोंबरे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांच्या वतीने बोलताना सौ.पौर्णिमा तावरे म्हणाल्या की, अनिता जगताप या विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवित असतात. आरोग्य शिबीराने गरजुंना व्याधींपासून मुक्तता मिळणार आहे. मुलांचा शाळेत जाण्याचा उत्साह वाढलेला आहे दोन वर्ष कोरोनामुळे मुलं चार भिंतीत होती. गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा उत्साह आणखीन वाढविण्याचे काम केले असल्याचे तावरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने आपल्या दारासमोर एक झाड लावून त्याची निगा राखावी. आपली बारामती स्वच्छ व सुंदर कशी राहील याबाबत सतत प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले.
सौ.अनिता जगताप व दिनेश जगताप यांनी जास्तीत जास्त झाडे लावून महात्मा फुले व्यायामशाळेचा परिसर हरित केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या शिबीरामध्ये वजन-उंची, रक्तदाब, रक्तातील साखर, नेत्र तपासणी व मोफत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, गरजुंना चष्मे वाटप करण्यात आले. बहुसंख्य गरजुंनी या शिबीराचा लाभ घेतला. पुणे लोणी काळभोरच्या विश्र्वराज हॉस्पीटलचे कार्यकारी संचालिका डॉ.सौ.आदिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर घेण्यात आला असल्याचे दिशेन जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्र्वास लोंढे यांनी केले तर आभार माजी नगरसेविका सौ.अनिता जगताप यांनी मानले.
सोनू राठोड, प्रकाश साबळे, विलास लोंढे, विकी जगताप, प्रमोद सोनवणे, आकाश मागाडे, विराज वाघमोडे, शैलेश पवार, मयुर कांबळे, मधुकर काकडे, अमन पाटोळे, सनी जगताप, सुरज खलाटे इ. मोलाचे परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page