बारामती शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदाराचे अकाली निधन


बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शितल जगताप गलांडे. यांचे त्या प्रसूती रजेवर गेल्यानंतर प्रसूतीनंतर त्यांना डेंगू आजाराची लागण झाल्याने त्यांचे आज पहाटे के ई म रुग्णालय पुणे निधन झालेले आहे.
शितल मॅडम बारामती शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या व पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे अकाली निधन होणे पोलीस दलासाठी न भरून निघणारी उणीव आहे.
त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दल व बारामती शहर पोलीस ठाणे सहभागी आहे. त्यांच्या पाठीमागे पती एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. भावपूर्ण श्रद्धांजली💐निशब्द
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व संपूर्ण बारामती शहर पोलीस ठाणे यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा अंत्यविधी शासकीय ईतमामात पणधारे या ठिकाणी सकाळी दहा वाजता होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page