बारामती: जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तैलचित्राचे अनावरण रशिया या देशांमध्ये झाले ही बाब तमाम भारतीयांसाठी आनंदाची, व अभिमानाची आहे . त्यामुळे बारामती येथिल युवकांनी आण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमि आसलेले वाटेगाव या ठिकाणी समाजिक कार्यकर्ते अभिषेक खरात .जय लहुजी फ्रेंन्ड सर्कलचे अध्यक्ष केदार भाऊ पाटोळे. परिवर्तन सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष बबलु भाई शेख. सनि दुर्वे. आदित्य भोसले. यांनी तेथे जाऊन त्यांच्या स्मारकास आभिवादन करुन एकमेकांना पेढे मिठाई भरवत आनंद उत्सव साजरा केला.






