बाल कल्याण केंद्र मूकबधिर मुलांची निवासी शाळा येथे जागतिक अपंग दिनानिमित दिव्यांग मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न


बारामती : बाल कल्याण केंद्र मूकबधिर मुलांची निवासी शाळा व राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कल्याण केंद्र मूकबधिर मुलांची निवासी शाळा येथे 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन व दिव्यांग मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये बारामती तालुक्यातील सर्व प्रकारचे दिव्यांग अठरा वर्षापुढील यांची मतदान नोंदणी करण्यात आली.या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे नायब तहसीलदार सौ शिंदे मॅडम उपस्थित होत्या व प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल मोकाशी सर, खजिनदार माधुरी मोकाशी मॅडम, सचिव संदीप मुळीक सर, मुख्याध्यापिका मालती खैरे मॅडम व व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी काळे मॅडम यांनी केले व आभार अश्विनी मुळीक मॅडम यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page