बारामती : प्रतिक जोजारे यांच्या संकल्पनेतुन सर्वधर्म समभाव समिती तर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त शिवभक्तांना फेटे बांधले आणि मिरवुकीत सहभागी झालेल्याना बिस्लरी पाणी वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष मोहिन शेख, चैतन्य गालिंदे, कार्याध्यक्ष अक्रम बागवान, ओव्हाळ,सहखजिनदार केदार पाटोळे यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. या समितीचे सल्लागार गणेश गालिंदे, योगेश(भैय्या) महाडीक, सचिन बल्ली सोनवणे, वसिम शेख व आदील तांबोळी तसेच बारामती येथील सुप्रसिद सराफ व्यवसायीक गणेशकाका जोजारे हे समितीचेआधारस्तंभ आहेत. त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.






