प्रतिनिधी:शकुल मोरे

निंबुत:दिनांक 22 मार्च रोजी भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना अध्यक्ष गौरव आहिवळे यांच्या संकल्पनेतून बारामती तालुक्यातील निंबुत येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. तालुक्यातील शाळांमध्ये आतापर्यंत ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की जर तुम्ही दहा रुपये कमावले तर त्यातील पाच रुपयाचे पुस्तक घ्या व राहिलेले पाच रुपये तुमच्या जीवनासाठी खर्च करा त्याचाच बोध घेऊन भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यापुढे देखील ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविणार आहोत. कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, कोळेकर सर, शेडकर मॅडम, भुसे मॅडम, भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुकाध्यक्ष गणेश जी फरांदे,कार्याध्यक्ष मधुकर बनसोडे, सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.







