बारामती: बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना रस्ता मिळावा यासाठी गणेश थोरात यांनी रस्त्याच्या नियोजित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर शासन परिपत्रक व ग्रामपंचायत आधिनियमनुसार अतिक्रमण निष्काशीत करून अतिक्रमणधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे असा तक्रारी अर्ज ग्रामपंचयातला दिला होता.सदर अर्जा नंतर ग्रामपंचायतने सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस काढली होती.तुम्ही ग्रामपंचायतकडे जमिनीच्या मालकी हक्काबाबत कागदपत्र सादर करा.आणि जमिनीची मोजणी करावी. अशी तीन नोटीस दिल्यानंतर काहींनी याबाबत न्यायालयामध्ये नोटीस विरुद्ध अपील केले आहे.
सदर जमीनीची मोजणी मा.गटविकास अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी ग्रामपंचायतने पैसे भरले होते.त्यांनतर मोजणीसाठी भूमि अभिलेखचे कर्मचारी आले होते.परंतु मोजणी झाली नाही.मोजणी का झाली नाही याबाबत ग्रामपंचायतला भूमि अभिलेख कार्यालयाकडून लेखी उत्तर मिळाले नाही.पुन्हा मोजणी होणार का? याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू आहे.येत्या काळात लवकरात लवकर मोजनी करुन रस्ता न मिळाल्यास ग्रामपंचायत काऱ्हाटी समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार आहे .असे गणेश थोरात यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
-
समाजातील गरीब वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणार :- वैभवजी गिते -
भारतीय युवा पॅंथर संघटनेच्यावतीने निंबुत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वही वाटप




