
बारामती : बारामती येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात दिनांक २४/०२०२३ रोजी कामानिमित्त जनजागृती न्युज संपादक गौरव अहिवळे गेले होते यावेळी सदर कार्यालयात एक शासकीय कर्मचारी व एक लहान मुलगा होता.या कर्मचाऱ्याला अर्ज जमा करायला दिला त्यावेळेस लहान मुलगा शासकीय कागदपत्र/ रजिस्टर एका कापडाने स्वच्छ करीत होता.यावेळी आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली की तुमचा मुलगा आहे का? कर्मचारी म्हणाला हो.त्यांनतर आम्ही विचारणा केली की मुलाला का काम सांगत आहात.शासकीय कागदपत्रे आहेत.संबंधित कर्मचारी म्हणाला की फाडित नाही स्वच्छ करतोय.
संपादक यांनी सांगितले की तुम्हीं लहान मुलांना काम सांगू नका लहान मुलांना काम सांगणे चुकीचे आहे तुम्ही आधिकारी आहात हे .शासकीय कागदपत्रे खराब होतील.याकडे लक्ष द्या.असे सांगितले. या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.काही शासकीय कर्मचारी लहान मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन येतात यावेळी मुलांना काम सांगणे चुकीचे आहे.तसेच शासकीय कागदपत्रे जतन करण्याचे आधिकारी यांचे कर्तव्य आहे.सदर कर्मचाऱ्यावर वरिष्ठ आधीकरी कारवाई करणार का?यावेळी सदर विभागातील इतर आधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. याबाबत संपूर्ण व्हिडिओ जनजागृती न्युज च्या पेजवर अपलोड करणार असल्याची माहिती अहिवळे यांनी दिली.सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे ही यावेळी सांगितले.