बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाड्याची रक्कम भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे व दंडात्मक व कटू कारवाई टाळावी.
जे मिळकतधारक थकबाकी व चालू वर्षाची रक्कम भरणा करणार नाहीत त्यांचे
नळ कनेक्शन बंद करणे.
थकबाकी धारकांची नांवे दैनिक वर्तमानपत्रा मध्ये प्रसिद्ध करणे.
मिळकती सील करणे.
मिळकत अटकावून ठेवणे.
मिळकत धारकाचे घरासमोर वाजंत्री वाजवणे.
इत्यादी प्रकारची कारवाई नगर परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
तरी शहर विकासात हातभार लावण्यासाठी व भविष्यात होणारी कटू कारवाई टाळणे साठी घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे इत्यादी कराची रक्कम भरणा करून बारामती नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन बारामती नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे
नागरिक घरपट्टी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात
वसुली लिपिक कडे घरी भरू शकतात
अथवा नगरपालिकेमध्ये नागरी सुविधा केंद्रात भरू शकता.