प्रतिनिधी : गणेश थोरात
बारामती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काऱ्हाटी येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत बाल आनंद बाजार व खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी आठवडे बाजारचे आयोजन करण्यात आले होते.बाजाराचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामधील विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या,
फळभाज्या,फळे आणली होती.
खाऊगल्ली मध्ये वडापाव,इडली, आप्पम,पॅटीस,पोहे,
वेफर्स,शेंगदाणे,फुटाणे,दिवाळी फराळाचे पदार्थ , गरमागरम चहा,कॉफी अशी विविध दुकाने थाटली होती.
यावेळी मोठ्या प्रमाणात पालक,व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलांना आर्थिक देवाणघेवाण,बाजार संकल्पना,गणिती क्रिया समजाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापक हनुमंत शिंदे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक दत्तात्रय सुर्वे,अमोल भोसले,सुरेखा भोसले,सुनंदा चांदगुडे यांनी केले.






