बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील एकावर विनयभंग आणि सावकारीचा गुन्हा दाखल


बारामती : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील आरोपी संतोष दिनकर खोमणे याने सावकारी करण्याचा कसलाही परवाणा नसताना विट भट्टी व्यवसाया करीता 1 लाख रुपये व्याजाने दिलेले होते त्याबद्दल फिर्यादीचे पतीने आरोपीस वेळावेळी व्याजाची रक्कम देवुन सुध्दा आरोपी संतोष दिनकर खोमणे याने फिर्यादीचे पती कडे घरी जाऊन वेळोवेळी व्याजाचे पैशाची मागणी करीत होता.तसेच. दिनांक १८/०८/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० वाजनेचे सुमारास आरोपीने फिर्यादीचे घरात अनाधिकाराने प्रवेश करुन फिर्यादीस पाठीमागून दोन्ही हातानी कवळ मारुन जवळ ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादीचे डावे गालावर चापट मारुन ,डोक्याचे केस ओढुन फिर्यादीस सोडविण्या करीता फिर्यादीचे पती व पुतण्या आले असता आरोपी मजकुर याने फिर्यादीचे पतीस शिवीगाऴ दमदाटी करुन हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे मजकुरची फिर्याद वरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आलेला आहे .गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना पाठविला असून पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page