बारामती : वीर सावरकर जलतरण तलावा जवळील चेंबर मध्ये गाई पडली होती.चेंबर साधारण १०ते १२फुट खोल होता. कर्मचारी चेंबर मध्ये उतरवुन गायीच्या पाठीला दोन दोर बांधून सदरील दोर जेसीबीच्या हुकाला अडकविला व दुसरा दोर कर्मचारीसह आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी स्वत: धरुन गायीला सुरक्षित व जास्त इजा न होता वर काढण्यात आली.
सदरील गाईला आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी सुरक्षितपणे काढुन गाईला जीवदान दिले.






