बारामती शहरातील अवैध मटका धंद्यावर कधी होणार कारवाई ? मटका धंदा बंद होईल का ?मटका चालविणारांचे मालक कोण?


बारामती : बारामती शहरात मटका सर्रास चालू आहे.या व्यवसायावर पोलिसांनी कडक कारवाई करून असे अवैध धंदे बंद केले पाहिजेत.असे व्यवसाय चालविणाऱ्या व्यक्तींना पकडुन त्यांच्या मूळ मालकांवर देखील कारवाई झाली पाहिजे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.मूळ मालकावर कारवाई होत नसल्यामुळे सदर मटका मालक दुसरा एखादा चालक बघून नव्याने धंदा सुरू करतो.त्यामुळे मटका चालविणाऱ्याचा मालक कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी सामजिक संघटना करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांमधून मटका व्यवसाय बंद कधी होणार याबाबत नेहमी चर्चा होताना दिसत आहे.मटका सुरू असलेल्या ठिकाणाची माहिती जाहीर दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असल्यास कारवाईची प्रेस नोट पत्रकारांना दिली नाही.इतर वेळेस बारामती शहर पोलिसांकडून पत्रकारांना केलेल्या कारवाईची प्रेस नोट दिली जाते.मग मटका व्यवसायावर झालेल्या कारवाईची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली पाहिजे जेणेकरून पत्रकार पोलिसांचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवतील.

उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका सभेत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची आदेश दिले होते. तरीदेखील बारामती तालुका शहरात अवैद्य व्यवसाय जोमात चालू आहेत.मग उपविभागीय पोलिस आधिकारी मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का?

मटका व्यवसाय बारामती शहरातून बंद होणार का?अशा अवैध व्यवसाय मुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्याला आळा बसणार का?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page