बारामती : बारामतीचा विकास करीत असताना सर्वसामान्य घटकाचा विचार झाला पाहिजे.रोजगार मिळाला तरच लोकांचा विकास होऊ शकतो. बारामती शहरातील बारामती ते एम.आय.डी.सी रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये फूटपाथ वरती दुकाने (गाळे) बांधण्याचे काम चालू आहे. सदर दुकाने प्राधान्याने पथविक्रेत्यांना दिली पाहिजेत असे अस्लम वस्ताद शेख पुणे जिल्हाध्यक्ष भारतीय युवा पँथर संघटना यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
पथविक्रेत्यांसाठी यांच्यासाठी असणारी आरक्षित जागा (हॉकर्स झोन) अद्याप जाहीर करून पथविक्रेते यांना हक्काची जागा विकसित बारामतीत दिलेली नाही.त्यामुळे पथविक्रेते त्याच्या हक्कापासून वंचित आहेत.सदर दुकाने गरीब लोकांना, पथ विक्रेते यांना मिळणार का? येत्या काळात पथ विक्रेत्यांना आरक्षित जागा मिळणार का? पथ विक्रेते यांचे प्रश्न कधी सुटणार? निवणुक झाली की पुन्हा अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागणार? मोठ्या इमारती आहेत ज्याला पार्किंग नाही तरी त्यांच्यावर कारवाई नाही.मोठ्या दुकानांचे, शोरूमचे अतिक्रमण फुटपाथवर असते ते दिसत नाही. गरिबांचे हातगाड्यांवरती कारवाई होते. बाकी अतिक्रमण वरती कारवाई होत नाही असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
-
भूमिपूजन, उद्घाटन, निवडणूक प्रचार असेल तरच होते आमराईची आठवण? -
निवडणुकीत नेता जनतेच्या दारात आणि नंतर जनता नेत्याच्या दारात अशी परिस्थिती झाली आहे : अस्लम शेख




