बारामतीच्या मंगलदास निकाळजे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड


बारामती (प्रतिनिधी) :
बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांची ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचालित माहिती अधिकार नागरिक समूह आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येवलवाडी, पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० वाजता प्रदान केला जाणार आहे.

📌 माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, न्यायिक, साहित्यिक, पत्रकारिता व सामाजिक प्रश्नांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येते. या गौरवशाली यादीत मंगलदास निकाळजे यांचे नाव झळकणे हे बारामतीसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील पारदर्शक शासन व सामाजिक विकासाच्या कार्यात निकाळजे यांचे योगदान अधोरेखित झाले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण लढाऊ कार्यशैलीची दखल राज्यपातळीवर घेतली गेली आहे.

याबद्दल बारामती व परिसरातून मंगलदास निकाळजे यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याची पावती या पुरस्काराच्या रूपाने मिळाल्याने समाजकार्य क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page