बारामतीः ह. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निवासी मुकबधीर विद्यालयातील मुलांना मिष्ठान्न भोजनाचा स्वाद देऊन पैगंबरांनी दिलेल्या उपदेश सर्व धर्म समभाव समितीने समाजात रूजविण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमास वतन की लकीरचे संपादक तैनुर ह. शेख, समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक जोजारे, समितीचे अध्यक्ष व कामे चिकन खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष मोईन शेख,
चैतन्य गालिंदे, सोहेल बागवान इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तैनुर शेख यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत माहिती देवून तरूणांना मार्गदर्शन केले. या समितीचे आधारस्तंभ गणेश जोजारे आहेत. यावेळी गणेश गालिंदे, आदिल तांबोळी, केदार पाटोळे, वसीम शेख, सुरज ओवाळ, मुजाहीद शेख, माळेगावचे पप्पु भिसे, दादाराम धोत्रे, मुजहीद कुरेशी, सद्दाम शेख इ. कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले






