माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील इंजिनियरिंग कॉलेजच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर नीरा डावा कालवा लागतो त्याच्या पासून थोड्या अंतरावर बंद पडलेल्या पोल्ट्री शेजारी खोल्यांमध्ये पत्त्याचा डाव चालू आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.जर असे जुगार अड्डे खुलेआम चालत असतील तर कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.युवा वर्ग याठिकाणी जुगार खेळण्यासाठी जात आहे.मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होत असल्याची देखील चर्चा आहे.
या जुगार अड्याच्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.लवकरच या जुगार अड्याची संपूर्ण माहिती घेऊन सदर माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना महाराष्ट्राचे नेतृत्वाच्या माध्यमातून देणार आहोत.