बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामती शहरात एकच वाक्य लोकांमध्ये बोलले जात आहे की १ नगरसेवक ३८ वर पडला भारी!
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात काम करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने तयारी दाखविली सत्यव्रत (सोनू)काळे यांनी पक्षात जाहीर प्रवेश करून बारामती युवक शहर अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. बाकी इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे काम केले असले तरी म्हणावे तेवढे यश मताधिक्य मिळवून देता आले नसल्यामुळे सुनेत्रा पवार यांना हार स्वीकारावी लागली अशी नागरिकांमधून बोलले जात आहे. काही नगरसेवक पाच वर्षात प्रभागात फिरकले सुद्धा नाही ते नगरसेवक प्रचार करीत असतील तर लोक यांच्यावर विश्र्वास कसा ठेवतील. बारामतीत निष्ठावान सक्रिय कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांना सुप्रिया सुळे यांच्या कामाची माहिती देण्यात यशस्वी झाले.नवीन चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आणि पक्षाच्या नावात झालेला बदल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवन्याचे काम बारामतीतील पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केले.त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले.
सत्यव्रत काळे यांचा जनसंपर्क चांगला आहे. लोकांना नेहमी मदत करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सत्यव्रत काळे लोकांची आणखी मदत करतील हा बारामतीतील लोकांना विश्र्वास आहे.






