तांदुळवाडी : बारामती शहराची हद्दवाढ झाल्यानंतर तांदुळवाडी परिसरात लोकसंख्या वाढत आहे.कंपन्या जवळ असल्यामुळे बाहेरून लोक याठिकाणी राहायला येत आहेत.
तांदुळवाडी येथील किराणा दुकानातून गुटखा विक्री,दारू विक्री चालू आहे.तांदुळवाडी येथील पाण्याच्या टाकी समोर असलेल्या श्री हरी किराणा स्टोअर्स मध्ये गुटखा मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. रेल्वे गेट जवळ असलेल्या दुकानात देशी दारू विक्री केली जात आहे तसेच छुप्या पद्धतीने मटका घेतला जात आहे.
बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई कधी होणार? या चालू असलेल्या अवैध धंद्यांचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
-
खा.सुप्रिया सुळे यांनी घेतली अहिवळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
-
माळेगावातील जुगाराच्या क्लबची नागरिकांमध्ये चर्चा