बारामती शहरात परवानाधारक दारूची दुकाने सकाळी सात वाजता सुरू?


बारामती : बारामती शहरातील परवाना धारक दारूची दुकाने,परमिट रूम,बियर बार सकाळी ७:०० वाजता दारू विक्री सुरू करतात.परवाना धारक यांना शासनाने वेळ ठरवून दिलेली आहे.याकडे उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करीत आहे.उत्पादन शुल्क विभागाचे आधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता काही दुकान यांना १०:०० वाजता दुकाने सुरू करण्याची वेळ आहे .तर काहींना वेगळी वेळ आहे अशी माहिती दिली.
काही दुकाने चौकात आहेत त्या दुकानाचे मालक पुढील बाजूचे शटर बंद ठेऊन मागील दरवाज्याने व्यवसाय सुरू ठेवतात.बारामतीत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय नावापुरते आहे.सदर कार्यालय एकदा ही सुरू आहे असे दिसत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.पत्र व्यवहार करायचा असेल तर दौंड किंवा पुणे या ठिकाणी जावे लागते
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार का? उत्पादन शुल्क विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत नाही ना?अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page