बारामती शहरातील नागरिकांना कचरा ओला व सुका कचरा वेग वेगळा करून देणेबाबत बारामती नगर परिषदेने आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.

कचरा एकत्रित दिल्यावर दुर्गंधी वाढते.त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही. कचरा ओला व सुका वेग वेगळा करून घंटागाडी कडे दिल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल.कचरा डेपो नाहीसा होईल.दुर्गंधी पसरणार नाही. बारामती शहर स्वच्छ सुंदर बनेल. अशी माहिती सोशल मीडियाद्वारे बारामती नगरपरिषदेने देऊन नागरिकांना कचरा ओला सुका वेगळा करून द्यावा याबाबत आवाहन केले आहे.






