बारामती: समाज कल्याण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सौ.संगिता डावखर, ग्रामीणचे पी.आय.भाऊसाहेब पाटील, नवनिर्वाचित सदस्य साधु बल्लाळ, राजु गायकवाड, हनुमंत पाटोळे, संतोष शेलार, चेतन जेधे, लव्हु निवंगुणे इ.सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत अनुसूचित जाती जमाती अंतर्गत येणार्या गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती जमाती अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रलंबित गुन्ह्यांमध्ये जातीचा दाखला प्राप्त न झाल्याने मिळणारा निधी संबंधित पिडीतांना मिळून देणेकामी अडचणी निर्माण होत आहे. यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हा स्तरावर संबंधित पोलीस स्टेशनला जिल्हा नियंत्रण समितीचा फलक लावणेबाबतचे आदेश यावेळी देण्यात आले.
दोन समाजात निर्माण होणारे वाद विकोपाला न जाता त्या वादात पोलीस व सदस्यांनी दुवा म्हणून काम करून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यायग्रस्त पिडीताला भेट देण्यासाठी जाताना सदस्यांना बरोबर घेऊन, त्याबाबत शासनातर्फे मिळणारी मदत व त्यास धीर देण्यासाठी चर्चा करण्यात यावी. दाखल्या अभावी मदतीपासून वंचित असणार्यांना दाखले मिळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दाखले तातडीने मिळण्यासाठी आदेश देण्यात येईल असे हिम्मतराव खराडे यांनी यावेळी सांगितले.
या दरम्यान बारामतीतील समाज कल्याण पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधु बल्लाळ यांनी अनुसूचित जाती जमातीबाबत विविध प्रश्र्न उपस्थित केले असता त्यास उपजिल्हाधिकारी खराडे, आयुक्त संगिता डावखर यांनी प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे मंगेश गाडीवान, एन.एन.घोडे, गोपीचंद आल्हाट, पोलीस विभागातील एपीआय इनामदार, पुणे शहरचे एलपीएम कामठे, पिंपरी-चिंचवडचे एलपीएम सकट, पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण श्री.पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
-
संत गाडगे महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन -
फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भारतीय युवा पँथर संघटनेकडून वाटप




