बारामती : बारामती नगर परिषदेकडे अनुसूचित जातीच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अर्जदाराने नगरपालिकेकडे केलेले अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रतींची माहिती अधिकारात गौरव अहिवळे यानी मागणी केल्यानंतर सदरची माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले. या अर्जांची नोंद असलेल्या रजिस्टरच्या प्रती देखील माहिती अधिकार मागणी केली असता सदर माहिती नगरपालिकडे उपलब्ध नाही निधी खर्च करण्याबाबत असलेल्या नियमांची माहिती नगर पालिकेकडे उपलब्ध नाही.असे उत्तर नगरपालिकेने दिले आहे.योजनेमधील निधी आखर्चित नाही असे देखील उत्तर दिले आहे. सदर योजने मधून एका व्यक्तीला घरकुल मंजूर करून निधी देण्यात आला आहे. व उर्वरित रक्कम शासनाला परत करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे ? एकूण अर्ज आलेले नोंद त्यांच्याकडे नाही.ज्या व्यक्तीला घरकुल देण्यात आले त्याचा अर्ज व त्याने दिलेली कागदपत्रे बारामती नगर परिषदेकडे उपलब्ध नाही.अनुसूचित जातीच्या व्यक्तींना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचे काम बारामती नगरपालिका करीत आहे का? अनुसूचित जातीच्या नगरसेवकांनी सदर निधी शासनाला परत न करता अनुसूचित जातीतील लोकांना याचा फायदा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबाबत आणि योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची देखील माहिती त्यांची मुलाखत घेऊन जनजागृती न्युजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहे.





