महाराष्ट्र : शासनाच्या वतीने / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या •वतीने सर्व सामान्य जनतेशी पत्रव्यवहार करतांना सर्व पत्रव्यवहार / प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती इतर कोणत्याही दस्तऐवजावर अधिकारी / कर्मचारी यांना सही खाली स्वतःचे नाव, पदनाम, कार्यालय स्पष्ट अक्षरात लिहीणेबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५१६ / नवि-२० मंत्रालय, मुंबई -४०००३२. दिनांक:- २४ मे २०१८. रोजीच शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्व सामान्य जनतेशी पत्रव्यवहार करताना सर्व पत्रव्यवहार / प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती इतर कोणत्याही प्रकारच्या दस्ताऐवज अधिकारी / कर्मचारी यांनी स्विकारल्यानंतर केवळ सही केली जाते. बऱ्याचदा शासनाच्या वतीने स्विकारण्यात आलेला पत्रव्यवहार / प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती ह्या गहाळ होतात. त्यामुळे पत्रव्यवहार स्विकारणारा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यास अडचण निर्माण होते. तसेच विविध पत्रव्यवहार / आदेश निर्गमित करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे नाव, पदनाम नमूद नसल्याने केवळ स्वाक्षरीआधारे कोणी आदेश निर्गमित केले याची स्पष्टता होत नाही. यामुळे काहीवेळेस सामान्य जनतेलाही मनस्ताप सहन करावा लागतो. सदरील बाब मा. राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ, बेलापूर यांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या आदेशान्वये निदर्शनास आणून संबंधितांना सूचना देण्याचे आदेशित केले आहे.
राज्यातील सर्व नगर विकास विभागांतर्गत सर्व प्राधिकरणांनी वरील बाबी टाळण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेशी सर्व पत्रव्यवहार / प्रत्येक कागदपत्र / आदेश / पावती इतर कोणत्याही प्रकारच्या दस्ताऐवज अधिकारी/कर्मचारी यांनी स्विकारल्यानंतर वा निर्गमित करतांना सही खाली स्वत:चे नाव पदनाम कार्यालय स्पष्ट अक्षरात लिहिणे बंधनकारक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. ” राज्यातील सर्व नगर विकास विभागांतर्गत सर्व प्राधिकरणांनी शासनाच्या वतीने/स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्व सामान्य जनतेशी पत्रव्यवहार करताना सर्व पत्रव्यवहार / प्रत्येक कागदपत्र / आदेश/पावती इतर कोणत्याही प्रकारच्या दस्त ऐवजावर अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या सही खाली स्वत:चे नाव पदनाम कार्यालय स्पष्ट अक्षरात लिहिणे बंधनकारक करावे. जेणेकरुन कार्यालयाकडून अदा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक दस्तऐवज / कागदपत्रांवर कोणत्या अधिकारी किंवा कर्मचारी याने सही केली आहे हे कळू शकेल.”

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१८/५१६/नवि २०
उपरोक्त आदेशाचे पालन होईल याबाबत संबंधित प्राधिकरणाच्या प्रशासकीय प्रमुखांनी खातरजमा करावी. 3. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१८०५२४१७४००००५२५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने स्वांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.






