जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काऱ्हाटी येथे सावित्रीमाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.तसेच लेक शिकवा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रुपालीताई लोणकर या अध्यक्ष स्थानी होत्या.प्रमुख पाहुण्या म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील मॅडम होत्या.
या प्रसंगी विद्यार्थी व माता पालकांची भाषणे झाली.
अनेक विद्यार्थीनींनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा केली होती.तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा केली होती.
मुख्याध्यापक हनुमंत शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय सुर्वे,अमोल भोसले,सुरेखा भोसले,सुनंदा चांदगुडे यांनी केले.आभार अंगणवाडी सेविका सिमा राऊत यांनी मानले.
-
महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक स्पर्धा क्रीडाज्योत रॅलीचा बारामती येथे शुभारंभ -
वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संघटक पदी गणेश थोरात यांची निवड




