चेंबूर: चेंबूर येथील रुपाली चंदनशिवे या तरुणीने इक्बाल महंमद शेख मुस्लिम तरुणाशी एकमेकांच्या संमतीने अंतरजातीय विवाह केला होता.यातून त्यांना एक आपत्यसुद्धा झाले आहे.अंतर्गत वाद,घटस्फोट आणि मुलाचा ताबा या वादातून ही हत्या झाली असावी असा दावा चंदनशिवे कुटुंबियांनी केला.टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे अधिक तपास करीत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळताच आम्ही नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनशिवे कुटुंबाची भेट घेतली.सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली.पोलीस तपासात दिरंगाई होत असून कुटुंबियांनी केसचा तपास सी.बी.आय.कडून करावा अशी मागणी केली आहे.पीडित कुटुंबियांनी मीडियावर गंभीर आरोप केले.टीव्ही मीडियाने हे प्रकरण बुरखा व लव्ह जिहाद आहे असे दाखवले आहे ते चुकीचे असून अशा दलाल मीडियाचा निषेध करण्यात आला.आम्ही जे बोललो ते मीडियाने दाखवले नाही आणि लव्ह जिहाद झाला अशा बातम्या टीव्ही मीडियाने पेरल्या असाही आरोप चंदनशीवे कुटुंबीयांनी केला.आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी चंदनशिवे कुटुंबियांनी एन.डी.एम.जे संघटनेकडे केली आहे.घटना घडून चार दिवस उलटले परंतु अजूनपर्यंत कोणत्याही मंत्री, खासदार,आमदार,नेत्याने आमची भेट घेतली नाही असेही कुटुंबाने सांगितले.यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी शासन प्रशासन यांच्यावर हल्ला चढवत पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती, जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्याची मागणी केली तसेच वैभव गिते यांनी सर्व मुस्लिम समाज आमचे बांधव आहेत.त्यामुळे लव्ह जिहाद म्हणून सर्व मुस्लिम बांधवांना मीडियाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे अंत्यत दुर्दैवी आहे.जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे.परंतु जाणून बुजून बुरखा,लव्ह जिहाद अशी नावे देऊन प्रकरणाला वेगळी दिशा देणाऱ्या मीडिया व राजकरणी लोकांपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रामताई आहिरे यांनीसुद्धा शासनाचा निषेध करत पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले सोबत सामाजिक कार्यकर्ते आनंद म्हस्के, लाईव्ह महाराष्ट्र टुडे चे संपादक राहुल सावंत,आनंद जगताप हे उपस्थित होते.






