बारामती :सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. आपण सर्व नारी सन्मान करीत असतो. आता महिला पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत हे त्यांनी कर्तुत्वावरून दाखवून दिले आहे. पोलीस दल तसे कष्टप्रद जॉब आहे या नोकरीमध्ये पुरुषांची मक्तेदारी होती परंतु आता या क्षेत्रात महिला मागे नाहीत बारामती शहर पोलीस ठाण्याला नुकताच आपला प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून दोन महिन्यापूर्वी संध्या देशमुख या महिला पोलीस उपनिरीक्षक दाखल झालेले आहेत. या अधिकारी महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांनी त्या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी जी प्रशिक्षणार्थी बाहेर पडताना होणारी श्रीमनियल परेड असते त्याचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. मानाची तलवार त्यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी बहाल केलेली आहे. मोर्चा लातूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील महिला अधिकाऱ्याच्या कर्तुत्वाला सलाम. बारामतीच्या निर्भया पथकाचे ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत.व सर्व युवतींनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. बारामती शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून आमच्या या भगिनींचा आम्हास सार्थ अभिमान आहे.





