बारामती : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक (थम) हजेरी चालु कारा या मागणी साठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने तालुका गट शिक्षण अधिकारी मा. गावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले ,कारण विद्यार्थी हा शाळांमध्ये फक्त हजेरी पटावर आहे.आणि शिक्षण माञ बारामती शहर आणी परिसरात असलेल्या खाजगी ॲकॅडमी लाखो रूपये फी भरून मध्ये घेते आहे, असा सगळा सावळा गोंधळ चालु आहे, शाळेमध्ये विद्यार्थीयाची ७५% उपस्थित असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी हजर नसतात? तर या गोष्टीला कोण पाठीशी घालत आहे? यांची प्रॅक्टीकल कशी घेतली जातात? व विद्यार्थी हा फक्त हजेरी पटावर उपस्थित आहे? व परिक्षा देण्यासाठी शाळांमध्ये येतोय व पास झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जान्यासाठी शाळेत येताना दिसत आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ॲड.अमोल सातकर यांनी सांगितले .या संदर्भात गट शिक्षण आधिकारी यांनी चौकशी करावी,अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे, या संदर्भात पञ दिले आहे यावेळेस राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर, विठ्ठल देवकाते, डॉ नवनाथ मलगुंडे, निखील दांगडे, किशोर सातकर आदी उपस्थित होते,






