बारामती : भारतीय युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाची सुरुवात पणदरे येथून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे कीट देऊन केली.
वसंतराव पवार मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह बाबुर्डी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वेळचे जेवण भारतीय युवा पँथर संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना दिले होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष यांनी एक हात मदतीचा असा उपक्रम संघटना राबवणार आहे याबाबत माहिती दिल्यानंतर वस्तीगृहाच्या सरांनी दोन विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे सांगितले.म्हणून दिनांक २१/०४/२०२२ रोजी संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट देण्यात आले.
यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड PRP तालुका अध्यक्ष आनंद लोंढे,समीर खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
-
भारतीय युवा पँथर संघटनेतर्फे शालेय साहित्याचे किट वाटप -
आपली बारामती प्लास्टिक मुक्त बनवण्यासाठी पर्यावरण दुत बनुयात. – महेश रोकडे मुख्याधिकारी बा.न.प.




