📚📚 *पुस्तकबँक*.
एक अभिनव उपक्रम…
बारामती: बारामती नगर परिषद आणि जय जवान माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक बँक या अभिनव उपक्रमाचे आयोजन बारामतीमध्ये करण्यात आले आहे. प्रत्येक घरात कमीत कमी एक विद्यार्थी असतोच… दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी नवीन पुस्तके खरेदी करत असतो… परंतु त्या वापरलेल्या पुस्तकांच काय? एकतर ते रद्दीला जातात किंवा घरात अडगळ होऊन राहतात… त्यापेक्षा ती जुनी पुस्तके गरजू विदयार्थ्याना उपयोगी ठरू शकतात…
बारामती नगर परिषद व जय जवान आजी माजी सैनिक संघटना बारामती यांचे संयुक्त विद्यमाने *पुस्तक बँक या अभिनव उपक्रमाचे आयोजन दिनांक 9 व 10 एप्रिल रोजी करणेत येत आहे*… ज्यामध्ये आपणाकडील सुस्थितीत असणारी जुनी शालेय पुस्तके आपण जमा करू शकता व आपणास आवश्यक असणारी पुस्तके घेऊन जाऊ शकता (उपलब्धतेनुसार)….
याचा लाभ सर्व गरजू ना होईलच त्याचबरोबर पुस्तकांचा पुनर्वापर करून पर्यावरणास मदत सुद्धा होईल…..
या उपक्रमध्ये सर्व सहभागी व्हा
जे नको ते द्या, जे हवे ते घेऊन जा…
*दिनांक 9 व 10 एप्रिल 22*
*वेळ : सकाळी 8 ते 12*
ठिकाण:
शारदा प्रांगण
जय जवान माजी सैनिक संघटना कार्यालय सूर्यनगरी
शाहू हायस्कुल
सातव शाळा
समन्वयक :-1) संतोष तोडकर 8850732061
2) रणधीर लोहाट 8010704249
3) हनुमंत निंबाळकर 7447800391
4) शिवनींगा माळी 9881687815
सदर उपक्रमाबाबत काही माहिती हवी असल्यास वरील नंबरवर संपर्क करा.
बारामतीमध्ये असे सामजिक उपक्रम बारामती नगरपरिषद आणि सामजिक संघटनांच्या मदतीने आयोजित करणार असल्याबाबत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.






