बारामती : बारामती शहरात इंदापूर रोड लगत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच इमारतीच्या छतावर बसून काही जन दारु पित बसतात.

सदर इमारतीची उंची जास्त असल्यामुळे मद्यपी नागरिकांना येता जाता दिसतात तरी देखील कसलीही भीती या दारु पिणाऱ्या मध्ये दिसत नाही. तसेच काही वेळा तर दारूच्या मोकळ्या बाटल्या नागरी वस्ती कडे फेकतात यामुळे नागरिकांना दुखापत होऊ शकते.सिद्धार्थ नगर येथील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वारातून मद्यपि दारु घेऊन येतात तरी त्यांना कोणी विचारणा करीत नाही. प्रवेश द्वारावर सुरक्षा रक्षक असतात तसेच सीसीटीव्ही . बसविले आहेत.याठिकाणी रात्रीच्या दारु पार्ट्या चालतात तरी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे .
रात्रीच्या वेळी याठिकाणी नशा करणारे लोक येत असतील तर एखादा मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्रीच्या वेळी व्यापारी आपला माल सुरक्षित असल्याची भावना मनात ठेऊन समिती वर विश्र्वास ठेऊन दुकाने बंद करून जातात परंतु त्यांना कुठे माहीत आहे की रात्रीच्या वेळी कोणी ही समितीच्या आतमध्ये प्रवेश करू शकते.त्यामुळे व्यापारी,दुकानदार यांच्या मालाचे, दुकानाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे ?
सदर विषयासंदर्भात महाराष्ट्राचे नेतृत्वाचे संपादक गौरव अहिवळे हे सिद्धार्थ नगर येथील रहिवासी या नात्याने बारामती शहर पोलिस स्टेशनला तक्रार देणार आहेत.






