सुपे : सुपे परिसरात खुलेआम अवैध मटका चालू आहे.मटका चालक टपरी किंवा खोलीतून मटका चालवत नाही.खुलेआम रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत बसून मटका चालवतात.या मटका चालकांवर तात्काळ कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहिजे.अशी नागरिकांची मागणी आहे. मामा नामक इसम हा मटका चालवत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तसेच सुपे परिसरात युवक वर्गाला मोबाईल ॲप मधून ऑनलाईन चक्री गेम देऊन शाहरुख नावाचा युवक ही चक्री चालवत आहे.असे ॲप देऊन युवकांना अवैध व्यवसायाकडे वळविले जात आहे.
अवैध व्यवसायावर तात्काळ कारवाई करून असे व्यवसाय पुन्हा उदयास येऊ नये म्हणून उपाय योजना केली पाहिजे. नागरिकांमधून बोलले जात आहे.






