युवा वर्ग मोबाईल वरून चालविल्या जाणाऱ्या ऑनलाईन चक्री गेम मोठ्या प्रमाणावर खेळत आहे.या गेम साठी परवाना घेतला आहे का याची चौकशी केली पाहिजे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
या गेम मध्ये पैसे हरल्यावरती युवा वर्ग नैराश्यात जाऊ शकतो.म्हणून याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली पाहिजे.सायबर विभागाला याबाबत माहिती देऊन कारवाई झाली पाहिजे.जेणेकरून युवा वर्ग या ॲप मुळे उद्ध्वस्त होणार नाही.
चक्रीचे ॲप शाहरुख नावाचा युवक चालवत आहे.अगोदर ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतो. त्यानंतर ॲप वर चक्री खेळण्यासाठी फोन पे वर पैसे घेतो.

आणि चक्री खेळण्यासाठी रिचार्ज करतो.या ॲपला कायदेशीर परवानगी आहे का? तसेच ऑनलाईन पैसे स्विकारण्यासाठी परवानगी आहेत का? याची चौकशी व्हायला हवी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
हा युवक बारामती ग्रामीण भागतील सुपे परिसरात राहत असल्याची चर्चा आहे.याबाबत सर्व माहिती महाराष्ट्राचे नेतृत्वाच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहे.
युवा वर्गाने कमी वेळात पैसे कमविण्याच्या नादात अशा ॲपचा वापर करू नये.होणारे नुकसान टाळावे.असे आवाहन आम्ही करीत आहे.






