बारामती : बारामतीत खाकी वर्दी घालून काम करणारे पोलिसांना पाहून आभिमान वाटतो तर बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी वर्दी घालून दुकानाची जाहिरात करीत असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असे मत भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
गणवेश परिधान करून बारामती शहरातील कापड दुकानाची जाहिरात करीत असल्याचा व्हिडिओ कापड दुकानदाराने सोशल मीडिया वरती अपलोड केला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा होत आहे की जर पोलीस अधिकारी दुकानाच्या जाहिराती करीत असतील तर भविष्यात इतर दुकानदार सुधा जाहिरात करणेसाठी अधिकारी यांना बोलवतील.
अवैध्य व्यवसाय करणाऱ्या किंवा गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तींना सुधारण्यासाठी एखादा नवीन उपक्रम राबविण्याचे सोडून फक्त स्वतः जाहिरात करण्यात व्यस्थ अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
कापड दुकानाची जाहिरात करणाऱ्या अधिकारी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक २६/०१/२०२४ पासून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर भारतीय युवा पँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे साखळी उपोषण करणार आहेत. तसेच उपोषण करून देखील कारवाई झाली नाही तर मे.उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल करणार आहे.तसेच संबंधित सम्यक कापड दुकान यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.असे मत गौरव अहिवळे यांनी व्यक्त केले.






