बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील विकास कामांची पाहणी केली परंतु दलीत वस्तीत सुरू असलेल्या कामांची पाहणी त्यांनी केली नाही.दलीत वस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे का?अनेक कामे दलीत वस्तीत सुरू आहेत.काही पूर्ण झाली आहेत त्याचे उद्घाटन झाले आहे.या विकास कामांचा नागरिकांना वापर करता येत आहे का? याची चौकशी सुद्धा यावेळी केली जात नाही.दलीत वस्तीत येऊन प्रचार केला जातो परंतु मतदान झाल्यावर या वस्त्यांकडे येऊ वाटत नाही का? दलीत वस्तीत सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी का केली जात नाही?
इतर ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी मात्र न चुकता केली जाते.दलीत अल्पसंख्याक वस्तीत सुरू असलेली विकास कामे ही विकासात येत नाहीत का? रस्त्याचे सुशोभीकरण म्हणजे विकास नव्हे.बारामती एम.आय. डी.सी. रोड दिसायला चांगला वाटत असला तरी वाहन चालवताना लक्षात येते की रस्ते लहान झाले आहेत.
याच रस्ता सुशोभीकरणासाठी वापरलेल्या निधीतून ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते केले असते तर नागरिकांचे समाधान झाले असते. पाण्याच्या तलावा वर सुशोभीकरण करण्यापेक्षा ज्या लोकांना नळ जोडणी(पाणी कनेक्शन) घेता येत नाही.अशा लोकांना या निधीमधून मोफत पाणीपुरवठा करता आला असता.
पथ विक्रेते,भाजी विक्रेते,फळ विक्रेते हे देखील मतदार आहेत.परंतु आज देखील फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) जाहीर करून दिले नाहीत.त्यामुळे पथ विक्रेत्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.
या सर्व गोष्टींकडे बारामती मध्ये उपमुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे?
दलित वस्तीतील कामांची पाहणी करताना इतर प्रश्न देखील समोर उपस्थित राहतील तसेच सोबत असलेला मीडिया दलित वस्तीच्या विकासावरती प्रश्न उपस्थित करतील म्हणून या भागांमध्ये चालू असलेल्या कामाची पाहणी करण्याचे टाळले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
-
श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था-मुख्याधिकारी महेश रोकडे -
फिर्यादी महिला करणार पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर आंदोलन




