बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अनेक वेळा स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून स्वच्छता कर्मचारी, एसटी कर्मचारी डिलिव्हरी बॉय व महिला,वस्तू विक्री करणारे यांच्यासोबत फेसबुक लाईक करून त्यांना प्रश्न विचारतात त्यांच्याशी संवाद साधतात.
गेल्या चार दिवसांपूर्वी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी केली.यामध्ये बारामती पोलीस वसाहतीची पाहणी केली तसेच बारामती बस स्थानकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पुढील कामासाठी सुप्रियाताई निघाल्या.परंतु त्याचवेळी एसटी स्टँड समोर असलेली दलित वस्तीला भेट का दिली नाही तेथील नागरिकांसोबत देखील तुम्ही इतर वेळी सामान्य लोकांसोबत जसे फेसबुक लाईव्ह करून संवाद साधता प्रश्न विचारतात. तसेच पद्धतीने तुमच्या मतदारसंघातील दलीत वस्ती अमराई येथील स्टँड समोरील परिसर, प्रबुद्ध नगर,अमराईचा इतर परिसर तसेच सटवाजी नगर,पंचशील नगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर या दलित वस्तीतील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जाणून घेतल्या पाहिजे असं नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण वाटत असेल की आम्ही सुप्रिया ताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. मोबाईल वरती फेसबुकच्या माध्यमातून सुप्रियाताई लोकांसोबत संवाद साधताना दिसतात.दलित वस्तीमधील लोकांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या कशा प्रश्न नागरिकांना पडतो. याच विकसित बारामतीत अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी नागरिकांना आंदोलन करण्याची गरज पडू नये म्हणजे नशीब. कारण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची इमारत बांधायला किती वेळ गेला हे सर्वांनी पाहिले इमारत होईपर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये राहतानाचे दिवस कोणीही विसरणार नाही.
पंचशील नगर मध्ये दरवेळेस नदीच्या पात्रात पाणी वाढले की घरात पाणी जाते, समाज मंदिरात झोपण्याची वेळ नागरिकांवरती येते त्यावेळी या लोकांच्या भावना लोकप्रतिनिधींनी एकदा जाणून घेतल्या पाहिजे.
या सर्व दलित वस्ती मधील नागरिकांची घरे आजदेखील कच्च्या स्वरूपाचे आहेत. दलित वस्तीमध्ये डांबरी रस्ते व पथदिवे लावणे म्हणजे आमचा विकास आहे का असा प्रश्न तेथील नागरिक करत आहेत.
पत्रकाराने सत्य मांडताना बरे मांडू नये खरेच मांडावे/ लिहावे
सुप्रियाताई यांचे काम चांगले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांनी बारामती शहरातील दलित वस्तीला भेटी देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत कारण फेसबुक पाहत असताना सुप्रियाताई सुळे या लोकांचे प्रश्न फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून मांडत असतात. परंतु त्याचवेळी बारामती मतदारसंघातील बारामती शहरातील दलित मागासवर्गीय वस्ती मधील नागरिकांसोबत एकदा तरी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला पाहिजे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
बारामती बस स्थानक/एसटी स्टँडचे काम सुरू झाले जुन्या बस स्थानकातील शौचालयाचा वापर स्टँड समोर दलित वस्तीत राहणारे लोक करीत होते.नवीन स्टँड होईपर्यंत लोकांचा शौचालयाचा प्रश्न निर्माण झाले आहे. स्टॅन्ड समोरील नागरिक हे भाजी मंडई येथील स्वच्छतेचा वापर करत आहेत. महिलांना देखील या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शौचालय जावे लागत आहे. जुने स्टॅन्ड मधील शौचालयाचा वापर नागरिक करत होते.परंतु हा प्रश्न घेऊन महिलांनी अजितदादांच्या जनता दरबारात रांगेत उभा राहून मग मांडायचा का?स्थानिक नेत्यांना या गोष्टी माहीत नाहीत काही का? स्थानिक पुढारी निवडणूक पुरते आहेत का? आणि नागरिकाची समस्या दिसत नाहीत का? नागरिकांनीच यांचा पाठपुरावा करायचा का?
दलित वस्तीतील प्रश्न जरी स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत मर्यादित असले तरी नागरिकांना वाटते की सुप्रियाताई यांना आपण खासदार म्हणून निवडून दिले त्यांनी देखील आमच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. पुढील वेळी सुप्रियाताई विकास कामांची पाहणी करताना दलित वस्तीची लाईव्ह कहाणी ऐकण्याचा प्रयत्न करतील का?