बारामती : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक दिवसांपासून नागरीक आजारी पडत आहेत अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत या रुग्णांमध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हिवताप, गोचीड ताप, संसर्गजन्य रोग, अशा प्रकारच्या साथीचे रोग रुग्णांमध्ये आढळत आहेत बारामती शहरांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढत चाललेले आहे.त्यामुळे या रोगांचे देखील प्रमाण वाढत चालले आहे मुख्यतः दलित वस्त्यांच्या अवस्था बिकट आहे दलित वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे दलित वस्त्यांमधील अस्वच्छतेमुळे या ठिकाणी मच्छरांचे प्रमाण जास्त आहे.संडासाची अवस्था अस्वच्छ असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
यामुळे अनेक नागरिकांना संसर्ग होऊन नागरिक व लहान लहान मुले गंभीर प्रमाणात आजारी पडत आहेत या वस्त्यांमध्ये असणारी गटारी सातत्याने तुंबत असल्यामुळे गटारीतील अस्वच्छ पाणी बाहेर येऊन नागरिकांच्या दारात तसेच घरामध्ये शिरत असते आणि याच गटारीच्या पाण्यामध्ये लहान लहान मुलं खेळून आज






